* ठाणे महानगरपालिकेत घडली ही घटना
* नवी मुंबईतील अशा सफाई कामगारांना अजून किती काळ अभय मिळणार?
ठाणे : कर्तव्य न बजावता केवळ हजेरी पत्रकांवर सह्या करणार्या सफाई कर्मचार्यांना ठाणे आयुक्तांनी आज चांगलाच धक्का दिलाय. १४ कामचुकार सफाई कामगारांना तातडीनं निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत.
काही कर्मचारी काम न करता केवळ हजेरी पटावर सह्या करतात, अशी तक्रार ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर स्वत: या गोष्टींत लक्ष घालत जयस्वाल यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली होती.
हा धक्कादायक प्रकार सर्रास सुरू असल्याचं यावेळी त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे, तत्काळ अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कडक कारवाईचा मार्ग आयुक्तांनी निवडला. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज उपाआयुक्त, घनकचरा व व्यवस्थापन यांचेकडून अहवाल मागवून अशा कामचुकारपणा करणार्या १४ सफाई कामगारांना तातडीनं निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत.
यामध्ये उथळसर प्रभाग समिती, नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीमधील सफाई कर्मचार्यांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने आज संध्याकाळी जारी केलेत.