नवी मुंबई : बालदिनाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी नेहरू जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका वाशी येथील प्रथम संदर्भ हॉस्पिटलमधील बालरुग्णांना मोफत फळे (सफरचंद,संत्री,मोसंबी) व गुलाबाची फुले देऊन बालरुग्णांसोबत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी रोजगार सेलच्या माध्यमातून बालदिन साजरा करण्यात आला.
रोजगार सेल अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष दशरथ भगत, नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड, नवी मुंबई जिल्हा सचिव सौ. संध्या कोकाटे, श्रीमती.विद्या भांडेकर, सौ.मिनाक्षी सोनावणे, संतोष सुतार, शिवाजी माने, गोविंद साटम, सनीर डोळस, अनिल गावडे, एस बालाजी, दिपक मोरे, सागर कांबळे, डॉ. रविंद्र गोसावी, सुमित लंबे, मनीष महापुरे, अक्षय शेटे, संदेश कांबळे, सुधीर पांचाळ, राजन सावंत, कृष्णा दळवी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.