उज्जैन : मध्य प्रदेशात कार्तिक एकादशीदरम्यान गाढवांचा मोठा पारंपरिक बाजार भरत असून यंदाच्या बाजारात ‘लालू-नितीश’ नावे दिलेली गाढवे सर्वाधिक आढळून आली आहेत. यामुळे बाजारात ही जोडी सर्वाधिक ‘हिट‘ ठरली आहे.
दरवर्षी शहरामध्ये गाढवांचा मोठा बाजार भरतो. दरवर्षी बाजारादरम्यान गाढवांना अभिनेता-अभिनेत्रींची नावे दिलेली पाहायला मिळतात. मात्र, बिहार विधानसभा निवडणूकीदरम्यानच्या निकालानंतर गाढवांना ‘लालू-नितीश’ अशा नावाची सर्वाधिक गाढवे आढळून आली आहेत.
येथील बाजारामध्ये देशातील विविध भागांमधून ग्राहक गाढवे खरेदीसाठी येतात. चार हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपयांपर्यंत गाढव विकले जाते. बाजारादरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. उलाढालीदरम्यान ‘लालू-नितीश’ हा शब्द सर्वाधिक उच्चारला जात आहे. प्रथमच राजकीय नेत्यांची नावे बाजारादरम्यान पाहायला मिळाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.