दार्जिलिंग : पर्यटनाची आवड असणार्यांसाठी एक खूशखबर आहे. चहाच्या मळ्यांमधून धावणारी दार्जिलिंगची जगप्रसिद्ध टॉय ट्रेन पाच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. नाताळच्या सुटीत पर्यटकांना घेऊन पुन्हा धावण्यासाठी ही टॉय ट्रेन सज्ज झाली आहे.
दार्जीलिंगची ही प्रसिद्ध टॉय ट्रेन तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये चित्रीत करण्यात आली आहे. दरड कोसळल्यामुळे २०१० मध्ये कुर्सिंयांग ते न्यू जलपैगुडी दरम्यानची ही सेवा बंद करण्यात आली होती. या ट्रेनमधून सफर करण्याचा मोह सर्वांनाच होतो. गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली ही ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. २०१० मध्ये दार्जिलिंग जिल्ह्यातील कुर्सियांग परिसरात दरड कोसळल्यामुळे या टॉय ट्रेनच्या रुळांचे नुकसान झाले होते. त्यामुळे २०१० पासून कुर्सियांग ते न्यू जलपायीगुडी दरम्या ही ट्रेन सेवा बंद ठेवण्यात आली होती.