मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जीने बुधवारी सकाळी मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी उदय चोप्राने ट्विटरवरून दिली. मुलीचे नाव ‘आदिरा’ ठेवण्यात आले असून राणीच्या या गोड बातमीमुळे मुखर्जी आणि चोप्रा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
मुंबईतील ब्रिचकॅन्डी रुग्णालयात बुधवारी सकाळी राणीला कन्यारत्न झाले. आदित्य आणि राणी यांच्या नावातूनच मुलीचे नाव ‘आदिरा’ असे ठेवण्यात आले.
आदित्य चोप्राचा मोठा भाऊ उदय चोप्रा तसेच त्याचा मित्र करण जोहरने ट्विटरवरून ही बातमी दिली. या बरोबरच बॉलिवूडचे कलाकार आयुष्मान खुराणा, परिणीती चोप्रा यांनी आदित्य, राणीला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या वर्षी २१ एप्रिल २०१४ रोजी नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत राणी आदित्य चोप्राशी विवाहबद्ध झाली होती.