मुंबई : दक्षिण-मध्य-मुंबई ही सर्वात सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं, पण हा एक गैरसमज असल्याचं समोर येत आहे, कारण या भागात बलात्काराची संख्या सर्वाधिक असल्याचं एका सामाजिक संस्थेनं म्हटलं आहे.
मुंबईतील दक्षिण-मध्य-मुंबईचा भाग महिला आणि लहान मुलांसाठी अत्यंत असुरक्षित असल्याचं प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे प्रजा फाऊंडेशनने. दक्षिण-मध्य मुंबई महिला आणि चिमुरड्यांसाठी प्रचंड असुक्षित आहे, असं प्रजा फाऊंडेशनने मुंबईतील २२ हजार ८५० नागरिकांची मुंबईतील सुरक्षेसंदर्भातील मतं विचारात घेऊन हा अहवाल तयार केल्यानंतर समोर आलं आहे.
दक्षिण-मध्य मुंबईतील चेंबूर, सायन कोळीवाडा आणि माहिम या तीन परिसरांमध्ये बलात्कार, विनयभंग आणि लैंगिक अत्याचारांच्या घटना सर्वाधिक घडतात, असेही या अहवालात नमूद आहे.
मुंबईत बलात्कार आणि विनयभंगांच्या एकूण २ हजार ३१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे यातील तब्बल ६४३ गुन्हे हे बलात्काराचे आहेत. हे गुन्हे सिद्ध करण्याचं प्रमाण १९८० पासूनच्या तुलनेत २७ टक्क्यांनी घटलं आहे, असं प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे.