नवी मुंबई / सुजित शिंदे
शिवसेनेच्या शिववाहतुक सेनेचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिलीपदादा आमले यांच्या माध्यमातून रिक्षा चालकांना नववर्षाची भेट म्हणून १ जानेवारीपासून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर पीयूसी उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या दीड दशकापासून दिलीपदादा आमले रिक्षाचालकांसाठी कार्यरत असून नवी मुंबई रिक्षाचालक मालक सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहे. या संस्थेचे तीन हजारापेक्षा अधिक सदस्य असून रिक्षाचालकांच्या समस्यांसाठी आमले विविध उपक्रम सातत्याने राबवित असतात. महाराष्ट्र शिववाहतुक सेना, रस्ता सुरक्षा प्रतिष्ठान-नवी मुंबई आणि नवी मुंबई रिक्षाचालक मालक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील रिक्षाचालकांसाठी ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर पीयूसी उपलब्ध करून दिली आहे.
नेरूळ सेक्टर ६ येथील अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूल,महाराष्ट्र शिववाहतुक सेना बेलापुर विधानसभा मध्यवर्ती कार्यालय असलेल्या नेरूळ सेक्टर १ मधील राजीव गांधी उड्डाणपुलाखालील एक्स सर्व्हिसमेन शॉपिंग कॉम्पलेक्स, शॉप नं. बी २६ येथे रिक्षाचालकांसाठी कुपन ठेवण्यात आली असल्याची माहिती देवून रिक्षाचालकांनी या संधीचा मोठ्या संख्येने फायदा घ्यावा असे आवाहन शिववाहतुक सेनेचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिलीपदादा आमले यांनी केले आहे.