नवी मुंबई / सुजित शिंदे
गोरगरीब व गरजू मुलांना संगणक प्रशिक्षण उपलब्ध व्हावे याकरता नवी मुंबई मनविसेच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून याकरता मनसेचे नवी मुंबई शहर सचिव व मनविसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड. कौस्तुभ मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई विभाग व न्यु ऑक्सफोर्ड टेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत संगणक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांकडून पुस्तकांचे व ऑनलाईन परिक्षेचे नाममात्र 500 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनटात अॅड. कौस्तुभ मोरे, मनविसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव निखिल गावडे, विभाग अध्यक्ष हर्षल झिंगरे, उपविभाग अध्यक्ष रोशन पाटील आदी पदाधिकारी व्यस्त आहेत. मोफत संगणक प्रशिक्षण घेवू इच्छिणार्यांनी सिवूड्स सेक्टर 25, मिलेनिअम पार्क, गाळा नं 11 या ठिकाणी अॅड. कौस्तुभ मोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.