नवी मुंबई / दीपक देशमुख
अतिशय कमी वयात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या पत्रकार प्रमिला पवार यांना रत्नागिरी येथील नवनिर्मीती फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. १६ जानेवारी रोजी उक्षी येथे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
समाजामध्ये विविध क्षेत्रात अनेक मान्यवर मंडळी आपआपल्या पद्धतीने सामाजिक कार्यात कार्यरत असतात. गेल्या चार वर्षापासून अशाच अनेक मान्यवरांचा व संस्थेचा शोध घेऊन त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी रत्नागिरी येथील नवनिर्मीती फाऊंडेशनतर्फे विविध पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या समाजकार्याची पोचपावती दिली जाते, अशी माहिती संस्थेचे सचिव व निवड कमिटीचे सदस्य डॉ. सलीम सय्यद यांनी दिली. १६ जानेवारी रोजी नवनिर्मीती फाऊंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून यंदाच्या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मान्यवरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार प्रमिला सुनिता राजेंद्र पवार यांना राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रमिला पवार यांनी अतिशय कमी वयात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत डोंबिवलीतील एका अपंग शिक्षकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून योग्य न्याय मिळवून दिला. यापुर्वीही त्यांना आदर्श महिला पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रमिला पवार यांच्यासह आणखी ९ जणांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसाद मोरेश्वर कार्ले (जीवनगौरव पुरस्कार), तेजस्विनी दिपक पाटील (राज्यस्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्कार), प्रमोद केशवराव मकेश्वर (राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार), रामानंद बाबुराव पुजारी (जीवनगौरव पुरस्कार), बुद्धघोष गमरे (राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार), मुरादपुर येथील कौमी इत्तिहाद एज्यूकेशन ऍण्ड वेल्फेअर सोसायटी (मंडणगड) या संस्थेला (राज्यस्तरीय आदर्श रत्न पुरस्कार), विजय राघो कदम (जीवनगौरव पुरस्कार), बाळासाहेब पाटणकर (जीवनगौरव पुरस्कार), अरविंद रामचंद्र भंडारी (जीवनगौरव पुरस्कार), तसेच आदर्श महिला बचत गट, एकता महिला बचत गट, अलसफा बचत गट, गजानन बचत गट, माता रमाई बचत गट यांना राज्यस्तरीय जीवनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश खरे, रत्नागिरीतील शिवसेना जिल्हा प्रमूख राजेंद्र महाडीक, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, जि.प. सदस्य ऐश्वर्या घोसाळकर, तहसिलदार हेमंत साळवी व सरपंच मिलींद खानविलकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.