नवी दिल्ली : कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली सरकारने सरकारी शाळांतील प्राथमिक वर्ग 23 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. तसेच खासगी शाळांनाही त्यांच्या वेळा बदलण्याचे आदेश देण्यात आलेत.
वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 21 ते 23 जानेवारीपर्यंत थंडीमुळे केजी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
यापूर्वीही सम-विषम फॉर्म्यूला राबवताना दिल्लीच्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. बिहारमध्येही थंडीमुळे 23 जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आलीये.