नवी दिल्ली : तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती यापुढे करणार नाही असा संकल्प अभिनेत्री सनी लिऑनने केला आहे. तसे आश्वासन तिने दिल्ली सरकारला दिले आहे.
बॉलिवूडमधील कलाकारांनी तंबाखूची जाहिरात करू नये, तसेच तंबाखूविरोधी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यासंदर्भात त्यांनी सनी लिऑनसह अजय देवगण, गोविंदा, अरबाज खान अशा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या संदर्भात पत्रही लिहिले होते. केजरीवालांच्या या पत्राला बेबी डॉलने सकारात्मक प्रतिसाद दिला.
सनी लिऑनचा पती डॅनियल याने दूरध्वनीवरून संपर्क साधून भविष्यात सनी तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करणार नाही असे आश्ववासन दिले, असे दिल्लीचे अतिरिक्त आरोग्य संचालक एस. के. अरोडा यांनी सांगितले.