नवी मुंबई : कु.वेदांत विश्वनाथ सावंत वय – ९ याने एलिफंटा ते गेटवे हे १४ कि.मी.चे सागरी अंतर २ तास ५० मिनिटात पोहून पार करुन एक नवीन विक्रम केला. नवी मुंबईकर वेदांतचा त्यांच्या घरी जाऊन शिवरायांची प्रतिमा देऊन शिवसेना सानपाडाचे कार्यकर्ते गणेश पावगे यांनी केले.याठिकाणी नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड. मनोहर गायखे यांनीही वेदांतचा सत्कार करत अन्य मुलांनीही वेदांतच्या पराक्रमापासून प्रेरणा घ्यावी असे ऍड. गायखे यांनी यावेळी सांगितले.