* शासनाच्या एलएडी बल्ब वितरण योजनेचा शुभारंभ
* नागरीकांना सवलतीच्या दारात एलएडी बल्ब वितरण
गणेश पोखरकर
कल्याण : उर्जा संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्या डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग योजने अंतर्गत आमदार नरेंद्र पवार यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिना निमित्त एलएडी बल्ब वितरण कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या कार्यलयात केले होते. शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कायम आग्रही काम करणार्या आमदार नरेंद्र पवार यांच्या या उपक्रमाला देखील नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते नागरीकांना बल्बचे वितरण करून करण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेविका वैशालीताई पाटील, भाजप महिला जिल्हा अध्यक्षा संजीवनी पाटील, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ पातकर, देवानंद भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाच्या योजना अगदी सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी विशेष उपक्रम हाती घेतले आहे. या उपक्रमा अतंर्गत केंद्र शासनाच्या डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग योजने अंतर्गत प्रजासत्ताक दिना निमित्त उर्जा संवर्धनासाठी सवलतीच्या दारात प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे एलएडी बल्बचे वितरण करण्यात आले. घरगुती ग्राहकांना बाजारात 400 रुपयांना मिळणारा 7 वॅटचा बल्ब अगदी सवलतीत मिळत असल्यामुळे नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्यसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या योजने अंतर्गत सुमारे 450 नागरीकांना 3000 हजार एलएडी बल्बचे वितरण करण्यात आले. या योजनेतून प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला प्रत्येकी 7 वॅटचे किमान 2 किंवा जास्तीत जास्त 10 एलईडी बल्ब वितरीत करण्यात आले. या बल्बची तीन वर्षांची वारंटी असून वारंटी पिरेडमध्ये नादुरुस्त झालेला बल्ब बदलून मिळणार आहे. एलईडी बल्बची खरेदी केल्यानंतर त्याची वीजग्राहकांनी पावती देण्यात आली. यावेळी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणार्या महावितरणचे अधिकारी मेश्राम आणि त्यांच्या सहकार्यांचा आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.