* उच्चस्तरीय निगराणी यंत्रणा स्थापन
नवी दिल्ली : कस्टम व एक्साइज डिपार्टमेन्टविरोधातील तक्रारी वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांना या दोन्ही विभागांबाबतच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी उच्चस्तरीय निगराणी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही विभाग वित्त मंत्रालयाशी संलग्न आहेत.
दरम्यान, जनतेत सरकारची प्रतिमा उजळण्यासाठी आणखी काय करता येईल, सरकारचे काही चुकत आहे का? चुकत असेल तर त्यावर कोणती उपाययोजना करता येईल, हे जाणून घेण्यासाठी मोदींनी बुधवारी अधिकार्यांसोबत चर्चा केली. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी दर महिन्यातून एकदा मंत्र्यांची बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मोदींना का बोलावली बैठक…
* केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नवव्यांदा बैठक बोलावली. जनतेत सरकारची प्रतिमा उजळण्यासाठी आणखी काय करता येईल, सरकारचे काही चुकत आहे का? चुकत असेल तर त्यावर कोणती उपाययोजना करता येईल, हे जाणून घेण्याचा उद्देश होता.
* देशातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उच्च सचिवांनी अधिकार्यांना मार्गदर्शन करावे. यासाठी मोदींनी उच्चस्तरीय निगराणी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
* बैठकीत मोदींनी कस्टम व एक्साइज डिपार्टमेंटच्या अधिकार्यांबाबत नाराजी व्यक्त केली. दोन्ही डिपार्टमेंटविरोधात सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या प्रोजेक्ट्सवर फोकस करण्याचे दिले निर्देश…
* पंतप्रधानांनी इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधीत रस्ते, रेल्वे, कोळसा व पॉवर प्रोजेक्ट्सची माहिती दिली. महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, पश्रि्चम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड व राजस्थानात या प्रोजेक्ट्सची कामे सुरु आहेत.
* मुंबई ट्रान्सपोर्ट हार्बर लिंक, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोर व जलमार्ग विकास प्रोजेक्टवर विशेष लक्ष देण्याचेही निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. जलमार्ग विकास प्रोजेक्ट अलाहबाद ते हल्दियादरम्यान उभारण्यात येत आहे.
* नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना उदयविषयी सचिवांना मर्गदर्शन केले.
* ओल्ड एज पेंशन योजनेचा गरजवंताना तत्काळ लाभ मिळावा, असेही निर्देश पंतप्रधानांनी दिले.