मुंबई : दरोड्याच्या केसमधील एका आरोपीने भरकोर्टातच जजवर चप्पल भिरकावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. दीर्घ काळापासून सेशन्स कोर्टात केस प्रलंबित असल्यामुळे वैतागून आरोपीने कृत्य केल्याचं म्हटलं जातं.
मुंबई सेशन्स कोर्टात मंगळवारी दुपारी १३ नंबरच्या कोर्टात ही घटना घडल्याची माहिती आहे. दरोड्याचा आरोप असलेल्या संबंधित आरोपीची केस दीर्घ काळापासून सेशन्स कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे हताश होऊन त्याने चप्पलफेक केल्याचं म्हटलं जातं.
चप्पलफेक केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं.