नवी दिल्ली : डीडीसीए घोटाळ्याची सीबीआय किंवा एसआयटी मार्फत चौकशी व्हावी ही किर्ती आझाद, बिशन सिंग बेदी यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
ऑक्टोबर 2015 ला सीबीआयने प्राथमिक चौकशी सुरू केलेली आहे त्यामुळे पुन्हा अशा प्रकारच्या याचिकेवर सुनावणी करण्याची गरज नसल्याचे न्या. मनमोहन यांनी म्हटले. सीबीआयने आतापर्यंत 18 साक्षीदारांची तपासणी केली आहे. त्यामुळे त्यांची तपासणी पूर्ण होईपर्यंत या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी केला होता. न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे.