मुंबई – बोगस डॉक्टरला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. शांताराम आरोटे असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
नेरूळमध्ये रहाणार्या उत्तम आधळे या तरुण वकिलाचा बोगस डॉक्टरचा उपचारामुळे मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आगदे या इसमावर मानुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आगदेची बोगस पदवी बिहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची होती.
यानंतर शहरातील बोगस डॉक्टरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. म्हणून महापालिका व पोलिसांनी बिहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची पदवी असलेले अन्य डॉक्टरांचे पदवीचे पेपर संबंधीत विद्यापीठाकडे तपासले असता शांताराम आरोटे या इसमाची पदवी बोगस निघाली. विशेष म्हणजे पदवी बोगस असूनही पालिकेच्या वैद्यकिय विभागासह राज्य मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्टर होते. पोलिसांनी अधिक तपास केला असता २५ हजार रुपयात ही पदवी कुलकर्णी नावाचा व्यक्तीकडून विकत घेतल्याच समोर आले आहे. पोलीस आता बोगस पदवी विक्री करणार्या टोळीच्या म्होरक्याला पकडण्याचा तयारीत आहेत.