: भारतीयांच्या रस्त्यात कचरा फेकण्याच्या सवयीची नेहमी चर्चा होते. देशभरात सर्व ठिकाणी असणार्या दुर्गंधीविषयी बोलले जाते. पंतप्रधानांनी ’स्वच्छ भारत’ अभियानाची सुरुवात केली खरी, पण त्याने किती बदल घडवला हा प्रश्न आहे. पण, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणाला बक्षीस दिले तर? आता हे प्रत्यक्षात होणार आहे. आता आपला कचरा कचराकुंडीत टाकल्यास वायफाय वापरायला मिळणार आहे.मुंबईतील दोन व्यापार्यांनी एका अशा कचराकुंडीची निर्मिती केली आहे ज्यात कचरा टाकल्यावर लोकांना वायफाय वापरण्यास मिळणार आहे. ’थिंकस्क्रीम’ कंपनीचे मालक राज देसाई आणि प्रतीक अग्रवाल यांनी ही प्लास्टिकची कचराकुंडी तयार केली आहे.
या कचराकुंडीत कचरा फेकल्यावर स्क्रीनवर एक कोड येईल. हा कोड आपल्या मोबाईलवर टाकल्यावर लोकांना १५ मिनिटांसाठी वाय-फाय इंटरनेट वापरता येईल. कचराकुंडीपासून ५० मीटरच्या परिसरात ही सुविधा वापरता येईल. यासाठीच एका मुंबईच्या एका टेलिकॉम कंपनीसोबत करण्यात आला करण्यात आली आहे. यातील प्रत्येक कचराकुंडीची किंमत एक लाख रुपयांच्या घरात आहे. मुंबईतील काही सिनेमा थिएटरमध्ये अशा प्रकारच्या काही कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत.