लातूरमधील पानगाव येथे शिवजयंती दिवशी भगव्या झेंड्यावरून पोलीस कर्मचार्याला मारहाण केल्यानंतर उटलेले वादळ मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊन शांत करण्याचे प्रयत्न केले आहे.शिवजयंती दिवशी काही टोळक्यांनी पोलीस कर्मचार्याला लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यात पोलीस गंभीर जखमी झाला. याप्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना स्व:ता चौकशी करण्याचे आदेश ट्विटरवरून दिले आहेत. हा हल्ला संपूर्ण पोलिसांवर असून कोण्या एका व्यक्तीवर नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.