: दक्षिण मुंबईतील एका तरुणाच्या मुंबई पोलिसांसोबत नव्या वर्षाच्या रात्री घडलेल्या एका वादाच्या केससंदर्भात सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हे मत मांडले आहे.बदरी अय्यर याचा नववर्षाच्या रात्री कुलाबा पोलीस ठाण्यातील पोलिसांसोबत वाद झाला. याविरुद्ध त्याने पोलिसात एफआयआर दाखल केली. नववर्ष स्वागतासाठी गेलेल्या बादरीच्या मैत्रिणीच्या पोषाखासंदर्भात पोलिसांनी उलटसुलट वक्तव्य केल्याची तक्रार या तरुणाने दाखल केली होती. याप्रकरणावर सुनावणी करताना ’बादरी याने पोलिसांना ’घाटी’ म्हटल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले’.