महाराष्ट्र शिववाहतुक सेनेचा पुढाकार
बेलापुर विधानसभा मतदारसंघात सेवा
: बारावी-दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा कालावधीत शुभेच्छा देणारे अनेक फलक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घटकांकडून जागोजागी लावले जातात. काही जण तर घरी जावून पेन व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देतात. शिवसेनेच्या महाराष्ट्र शिववाहतुक सेनेने त्याहीपुढे एक पाऊल टाकत बारावी व दहावीच्या परिक्षेला जाण्याकरता मुलांकरता मोफत वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. परिक्षेला जाण्याकरता वाहनाची गैरसोय असेल तर ङ्गफोन करा अन् गाडी हजरफ हा स्तुत्य उपक्रम बेलापुर विधानसभा मतदारसंघात सुरू केला आहे.
महाराष्ट्र शिववाहतुक सेनेचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिलीप आमले यांच्या पुढाकारातून बेलापुर विधानसभा मतदारसंघात यावर्षीपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. परिक्षेला जाण्याकरता अनेकदा वाहने लवकर उपलब्ध होत नसल्याने मुलांना विलंब होतो. मुलांची ही शैक्षणिक गैरसोय दूर करण्याकरता घरापासून परिक्षा केंद्रापर्यत जाण्यास वाहने उपलब्ध होत नसतील तर विद्यार्थ्यांनी फक्त ९५९४४२४२३४, ९८२१६९२७५६ या भ्रमणध्वनीवर परिक्षेला जाण्याअगोदर दीड तास कॉल करायचा. विद्यार्थ्यांनी संपर्क केल्यावर काही मिनिटातच वाहतुक सेनेकडून वाहतुक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येते.
बारावीच्या परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांकरता सुरू केलेला हा उपक्रम दहावीची परिक्षा देणार्या विद्यार्थ्यांकरताही सुरूच ठेवणार असल्याचे दिलीप आमले यांनी सांगितले.