– रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात हमसफर, तेजस, उदय या नव्या एक्सप्रेस रेल्वे गाडयांची घोषणा केली आहे. या नव्या गाडया नेमक्या काय असणार आहेत हे जाणून घेऊ यात.हमसफर ही पुर्णपणे ३ टायर वातानुकूलित सेवा आहे. तेजस ही ताशी १३० वेगाने धावणारी ऑनबोर्ड एंटरटेनमेंट सुविधेचा कोच असणार आहे. यामध्ये वाय-फायची सुविधाही असणार आहे. उदय ही रात्रीच्या गर्दीच्या वेळी वातानुकूलित डबलडेकर सेवा असणार आहे. या शिवाय अंत्योदय ही लांब पल्ल्याची अनारक्षित सुपरफास्ट गाडी असणार आहे.