पालघर : विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुकमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. लागण झालेल्या १७ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कासा बुद्रुकमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील २४७ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. यापैकी १७ जणांची प्रकृती गंभीर आहे.दरम्यान विद्यार्थ्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.