: महापालिका प्रभाग ८७ मध्ये गुरूवारी सकाळी शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार यांच्या उपस्थितीत विविध नागरी कामांचा शुभारंभ झाला.
शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या हस्ते प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ येथे ज्येष्ठ नागरिकांकरता निवारा शेड आणि प्रभागातील वै. नामदेव खाशाबा मांडवे मार्गाचे डांबरीकरण या कामाचे उद्घाटन झाले. २ लक्ष रूपये खर्च करून निवारा शेडचे बांधकाम करण्यात आले असून महापालिकेच्या सर्वसाधारण निधीतून वै. नामदेव खाशाबा मांडवे मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. नगरसेविका सौ. सुनिता मांडवे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरी कामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास शिवसेनेचे माजी मनपा पक्षप्रतोद रतन मांडवे, मनपा उपअभियंता उमेश पाटील, कनिष्ठ अभियंता शिपूरकर, शिवसेना शाखाप्रमुख दिपक शिंदे , शिवसेना महिला विभाग संघठक सत्वशीला जाधव (विभाग संघठक), माजी नगरसेवक रतन मांडवे, प्रकाश वाघमारे, सुरेश मोरे, शरद पांजारी, गौतम शिरवाळे, कुंभारकर, निगडे, साईश जाधव, देवराम यादव, कल्पना पांजारी, जयश्री बेळे, शुभांगी परब, सुनिता वांडेकर व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.