– केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी लोकसभेत केलेला दावा खोटा असून यावर राजकारण केले जात असल्याचा गंभीर आरोप हैदराबाद विद्यापीठातील आरोग्य विभागातील डॉक्टर एम. राजश्री यांनी केला आहे.
हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणावरुन बुधवारी लोकसभेत सरकारची बाजू मांडताना आत्महत्यानंतर रोहितच्या शरीराजवळ कोणत्याही डॉक्टरला जाऊ दिले नसल्याचा दावा केला होता. त्यावर विद्यापाठीच्या आरोग्य विभागातील डॉक्टर एम. राजश्री यांनी स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिलेली माहिती खोटी ठरवली आहे. १७ जानेवारी रोजी रोहित वेमुलाच्या आत्महत्येची माहिती मिळताच मी हॉस्टेलला गेले होते. रोहितला पलंगावर झोपवले होते. संध्याकाळी ७ वाजून २० मिनिटांनी मी घटनास्थळी गेले होते आणि रोहितची तपासणी करुन तो मृत झाल्याचं घोषित केलं होतं, तर घटनेच्या १५ मिनिटानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते, अशी कबूली डॉक्टर राजश्री यांनी दिली.
लोकसभेत चर्चेदरम्यान रोहित वेमुला आत्महत्यानंतर तो जिवंत आहे की मृत झालाय आहे याची शहानीशा करण्यात आली नव्हती तर त्यांच्या शरीराजवळ डॉक्टरलाही जाऊ दिले नसल्याची माहिती स्मृती इराणी यांनी दिली होती. दरम्यान डॉक्टर राजश्री यांनी दिलेल्या कबूलीनंतर हैदराबाद विद्यापाठातील विद्यार्थी जिकरुल्लाहा निशाही पुढे सरसावला. फेसबूकवर पोस्ट करुन मी रोहितच्या आत्महत्येनंतर स्वतः आरोग्य विभागाला याबाबत कळविले होते. माहिती मिळताच डॉ. जयश्री यांनी रोहितची तपासणी केली असल्याचा दावा करत स्मृती इराणीं यांनी लोकसभेत खोटी माहिती दिली असल्याचं जिकरुल्लाह म्हणाला.