: इंदापूरमध्ये पुन्हा एकदा वाळू माफियांची दहशत दिसून आली आहे. इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या वाहनचालकाला वाळू माफियांनी उडवलं. या घटनेत चालक अनिल काळेचा मृत्यू झाला.वाळू माफियांच्या तवेरा गाडीने अनिल काळेंच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली.दरम्यान इंदापूर पोलिसांनी तवेरा गाडीचालकाविरोधात भारतीय दंडविधान कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच या प्रकरणी दोन जणांना अटकही केली.