: देशद्रोहाच्या आरोपाखालील अटकेत असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावरील सुनावणीला दिल्ली हायकोर्टाने २९ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.‘जेएनयू’ प्रकरणी उमर खालिद आणि अनिर्बन यांच्या अटकेनंतर आता कन्हैयाची आणखी सखोल चौकशी करता यावी यासाठी त्याला नव्याने कोठडी सुनावण्याची मागणी करण्यात येणार असल्याचीही माहिती पोलिसांनी यावेळी दिली.दरम्यान, उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्या यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन पोलिसांनी गुप्तपणे चौकशी करावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. उमर खालिद आणि अनिर्बन मंगळवारी रात्री उशीरा दिल्ली पोलिसांना शरण आले.