मुंबई: ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींमध्ये राहणार्या रहिवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
अनधिकृत धोकादायक तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबईप्रमाणे ठाण्यातही क्लस्टर योजना लागू करण्याचा निर्णय भाजप-शिवसेना युती सरकारनं घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठाण्यासाठीच्या क्लस्टर विकासाच्या धोरणाच्या फाईलवर स्वाक्षरी केली.
ठाण्यातील जुन्या आणि धोकादायक इमारतींतील रहिवाशांबरोबर अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही या योजनेत घरे मिळणार आहेत. शिवाय झोपडपट्ट्यांनाही या योजनेत सामावून घेतलं जाणार आहे.