* बहिण बचावली
* शनिवारी रात्री १२ नंतर याच घरात झाले हत्याकांड
ठाणे : ठाण्यातील कासारवडवली येथे एकाच कुटुंबातील १४ जणांची हत्या करुन आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना घडली आहे. या हत्याकांडाचा खुलासा पाहाटे चार वाजता झाला, मात्र हे निर्घृणकृत्य रात्री एक वाजताच्या सुमारास घडले. हत्याकांडातून एक महिला बचावली असून ती गंभीर जखमी आहे.
घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील हस्नील अन्वर वरेकर याने पत्नीसह सहा बहिणी, ७ लहान मुले आणि एका पुरुषाची ते गाढ झोपेत असताना हत्या केली. हत्याकांडानंतर हस्नीलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हस्नीलने शनिवारी रात्री एका पार्टीचे आयोजन केले होते. त्याने सर्वांना घरी बोलवले होते. रात्री दोन वाजता नंतर शेजारच्या लोकांनी आरडोओरड ऐकली. घराची खिडकी तोडून एका महिलेला वाचवण्यात आले. ती आरोपीची बहिण असून तिचे नाव सुबिया भारमार आहे. ही २१ वर्षीय महिलेला जबर मानसिस धक्का बसला आहे. त्यामुळे अद्याप तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त परमवीसिंग आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह होते आणि गळफास घेतलेला हस्नील पोलिसांना आढळून आला. त्याच्या हातात सूराही तसाच होता. या घटनेने कासारवडवली भागात खळबळ उडाली आहे. हत्याकांडाचे कारण अद्याप समजलेले नाही.
आरोपी सुशिक्षित आणि शांत स्वभावाचा होता
शेजार्यांनी सांगितले, की आरोपी हा सुशिक्षीत तरुण होता. तो शांत स्वभावाचा होता. त्याने असे का केले याचे आम्हा सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
*** कोणा-कोणाची केली हत्या
* पोलिसांनी सांगितले, की तपासात समोर आले आहे, की आरोपीने सर्वात पहिले आई आणि दोन बहिणींची हत्या केली.
* त्यानंतर त्याने एक-एक करत आणखी चार महिलांची हत्या केली. त्याने एकून ६ महिलांची हत्या केली.
* मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. त्यात एक दोन महिन्यांची मुलगी देखील आहे.