: वर्दीवर हात उचलण्याचं धाडस वाढताना दिसत आहे. लातूरच्या पानगावमध्ये पोलिसांना झालेली मारहाणीची घटना ताजी असताना, ठाण्यातही महिला वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण झाली. राजकीय आशिर्वादामुळेच पोलिसांना मारहाण होत असल्याचा आरोप होत आहे.पोलीस वगळता इतर कोणत्याही सरकारी कर्मचारर्यांऩा मारहाण झाली असती, तर संप पुकारले गेले असते. पण मनात असूनसुद्धा ड्युटी करावी लागते, अशी भावना पोलिसांमध्ये आहे. हीच भावना मनात ठेवून, पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुपचे डीपी एकसारखे ठेवून पोलिसांना झालेल्या मारहाणीच्या निषेध नोंदवला आहे.मुंबई पोलिसांतील अनेकांनी स्वत:चे आणि व्हॉट्स ग्रुपचे फोटो एकसारखे ठेवले आहेत. या फोटोवर ‘आम्ही सर्व पोलीस एक आहोत’ असा मजकूर लिहिला आहे.