मुंबई : पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या (१३ मार्च) प्रवास करायचा असल्यास कोणतीही अडचण येणार नाही. कारण या दोन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक नसेल. मात्र, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. ठाणे ते कल्याण या स्थानकांदरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे.
ठाणे ते कल्याण रेल्वेस्थानकांदरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या रेल्वेमार्गावरील महत्त्वाच्या अभियांत्रिकी कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर रेल्वेमार्गावर शनिवारी म्हणजे आजच रात्री ६ तासांचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नसेल.
मेगाब्लॉकदरम्यान डाऊन जलद मार्गावरील वाहतूक ठाणे ते कल्याण स्थानकांच्या दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. मात्र, धीम्या आणि जलद मार्गावर धावणार्या सर्व गाड्या १५ ते २० मिनिटं उशिरानं धावतील.