– खाकी रंगाची अर्धी चड्डी आणि पांढरा सदरा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश गेली ९१ वर्षे आहे. तो आज बदलण्यात आला असून तपकिरी रंगाची फुल पँट आणि पांढरा शर्ट असा गणवेश यापुढे संघाचा असणार आहे.राजस्थानच्या नागौर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत याबाबत शिक्कामोर्तब झाले. गेल्या दशकभरापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेश बदलासंबंधी चर्चा सुरु असताना शुक्रवारपासून सुरु झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय आज झाला.