सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शनिवारी नेरूळ सेक्टर २८ मध्ये आयोजित करण्यात आलेले महिलांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
सांयकाळी ५ ते ७ पैठणी महोत्सव, ७ ते ७.३० ज्येष्ठ महिलांचा सत्कार, ७.३० ते ८.३० गोडवा महाराष्ट्राचा, सांयकाळी ८.३० ते १० स्नेहभोजन असे या महिला स्नेहसंमेलनाचे स्वरूप होते. जुईनगरमधील महिला बचत गटांकडून सादर करण्यात आलेल्या ‘गोडवा महाराष्ट्राचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमामधून ‘बेटी बचाव’ विषयक जनजागृती करण्यात आली.
या स्नेहसंमेलनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, नगरसेविका रूपाली भगत, सुजाता पाटील, शिल्पा कांबळी, जयश्री ठाकूर माजी नगरसेविका स्नेहा पालकर, निर्मला गावडे सहभागी झाल्या होत्या.
प्रभाग ९८ व प्रभाग १०९ मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नेरूळ सेक्टर २८ मधील श्रीगणेश सोसायटीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीच्या स्थानिक महिला अध्यक्षा सुलभा मोकाशी, सायली चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आलेे. या कार्यक्रमामध्ये प्रभाग ९८ व प्रभाग १०९ तसेच नेरूळमधील सहभागी झालेल्या महिलांचे नवी मुंबईचे माजी उपमहापौर स्थानिक नगरसेवक अशोक गावडे, उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती आणि स्थानिक नगरसेविका सपना गावडे-गायकवाड यांनी आभार मानले आहेत.