नवी दिल्ली, – जगाला शांती, अध्यात्माचा संदेश देणारे अध्यात्मिक गुरु श्री.श्री.रविशंकर यांनी इसिस बरोबर शांतता चर्चेचा प्रयत्न करुन पाहिला, पण इसिसने मुंडके छाटलेल्या माणसाचा फोटो पाठवून त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला.
मी इसिस बरोबर शांतता चर्चेचा प्रयत्न करुन पाहिला पण त्यांनी मला मुंडके छाटलेल्या माणसाचा फोटो पाठवला असे श्री श्री रविशकंर यांनी सांगितले. इसिसला शांतता नको आहे. त्यांच्यावर लष्करी कारवाई झाली पाहिजे असे रविशंकर आगरतळा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
त्रिपुराचा तीन दिवसाचा दौरा आटोपून ते कोलकाताला रवाना झाले. सर्व संस्कृती, धर्म आणि विचारधारेला एकत्र जोडण्याचे आपले लक्ष्य असल्याचे रविशंकर यांनी सांगितले.