नगरसेविका सुजाता पाटील यांची मनपाकडे मागणी
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणार्या मूषक नियत्रंणच्या कर्मचार्यांना सुविधाअभावी काम करताना होत असलेल्या अडचणींबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी यांना लेखी निवेदन सादर करताना मूषक नियत्रंणच्या कर्मचार्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
मूषक नियत्रंणच्या कर्मचार्यांना दोन ते तीन महिने वेतन मिळत नसतील तर ते नागरिकांना सुविधा पुरविणार कशा असा प्रश्नही नगरसेविका सुजाता पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मूषक नियत्रंणच्या कर्मचार्यांकडे ओळखपत्र नाही, मृतावस्थेतील, सडलेले उंदीर उचलण्यासाठी हाताला ग्लोव्हॅज नाही, वेळेवर गणवेश न दिल्याने फाटक्या गणवेशात कामगारांनी काम करणे आदी समस्यांचा विस्तृतपणे उहापोह करताना गमबूट व औषधांच्या सुविधांचाही नगरसेविका सुजाता पाटील यांनी निवेदनामध्ये उल्लेख केला आहे.