मुंबई – : राज ठाकरेंना हल्ली विसर पडायला लागलाय. ते ज्या सजावटीबद्दल बोलतायेत, ती 21 नोव्हेंबरला केली जाते, कारण त्या दिवशी हुतात्मा दिन असतो. गेल्या 5 वर्षांत हुतात्मा चौकात 1 मे रोजी कोणतीही सजावट केली जात नाही असं सणसणीत प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलंय. तसंच अभ्यास करून बोला असा सल्लावजा टोला ही लगावला.
महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौकात सजावटीवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत भाजप-सेनेवर जोरदार टीका केली होती राज यांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली होती. मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलतांना, मला लाज या गोष्टीची वाटतीये की, दरवर्षी हुतात्मा स्मारक हे फुलांनी सजवलेलं असतं पण यावर्षी एकही फूल नाहीये. राज्य सरकाने हे सजवण्याचं काम आहे. उलट आघाडी सरकारच्या काळात इथं सजावट केली जायची. याबाबतीत भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले. त्यांच्यावेळी हे सजवलेलं दिसायचं. जो मान स्मारकाचा राखयला हवा होता तो भाजप आणि शिवसेना दोघांनीही राखला नाही अशी नाराजीही राज ठाकरेंनी व्यक्त केली.
राज यांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी आणि अचूक उत्तर दिलं. राज ठाकरे यांना हल्ली विसर पडायला लागलाय. ते ज्या सजावटीबद्दल बोलतायेत, ती 21 नोव्हेंबरला केली जाते, कारण त्या दिवशी हुतात्मा दिन असतो. गेल्या 5 वर्षांत हुतात्मा चौकात 1 मे रोजी कोणतीही सजावट केली जात नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांना दिला. तसंच राज यांनी माहिती घेऊन आणि अभ्यास करून बोलावं, आणि चांगल्या दिवशी वाद उकरून काढू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.