सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : एकदा निवडून दिलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही. मनपा प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकीत वेगवेगळा नगरसेवक निवडून देणार्या नेरूळ सेक्टर 8 परिसराने एप्रिल 2015च्या निवडणूकीमध्ये शिवसेनेला व मांडवे परिवाराला सलग दुसर्यांदा महापालिकेत पाठवित परंपरा खंडीत केली. अर्थात हा विश्वास म्हणजे मतदारांनी रतन मांडवेंच्या जनसंपर्काला, साध्या रहाणीला, मनमिळावू स्वभावाला, केलेल्या विकासकामाला दिलेली खर्या अर्थांने पोचपावती होती. प्रभाग महिला आरक्षित झाल्यावर शिवसेनेने सौ. सुनिता रतन मांडवे यांना उमेदवारी दिली. कमी दिवसाचा कालावधी प्रचाराकरता मांडवे दांपत्याला मिळालेला असतानाही 942 मतांचे दणदणीत मताधिक्य हे विरोधकांना खूप काही सांगून जात आहे.
गतवेळचे महापालिका आयुक्तांना वारंवार सांगूनही, लेखी निवेदने देवूनही प्रभागाची पाहणी कार्यक्रमास पालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात असल्याचे पाहून सभागृहात जमिनीवर बसण्याचा इशारा नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी देताक्षणी प्रशासनाला जाग आली व पालिका आयुक्तांचे पाहणी अभियान राबविण्यात आले. प्रभागातील समस्या निवारणाकरता व प्रभागातील नागरी सुविधांकरता गेली वर्षभर प्रशासनदरबारी पाठपुरावा करणार्या नगरसेविका सुनिता रतन मांडवे या विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षालाही जवळून पहावयास मिळाल्या आहेत. पालिका अधिकार्यांकडून प्रभागतील कामे करून घेण्याचे अजब कौशल्य रतन मांडवेंना अवगत होते. त्याचाच वारसा सुनिता रतन मांडवेंनी चालविल्यामुळे महापालिका तिजोरीत पैशाचा खडखडाट असताना व विरोधी पक्षाच्या नगरसेविका असतानाही अवघ्या वर्षभराच्या कालावधीत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून विभागातील कामांना मंजुरी मिळविण्यात नगरसेविका सुनिता रतन मांडवेंना यश आले आहे.
1) तृप्ती शॉपिंग कॉम्पलेक्स ते ग्रीन फिल्ड अपार्टंमेंटपर्यत पदपथाची सुधारणा करणे 2) कमलेश हॉस्पिटल ते गांवदेवी चौकपर्यतच्या पदपथाची सुधारणा करणे 3) अरूणोदय अपार्टमेंट ते शाहू महाराज उद्यानापर्यत पदपथाची दुरूस्ती करणे 4) शिवनेरी अपार्टमेंट पश्चिम बाजूस असलेल्या गटारांची सुधारणा करणे 5) शिवनेरी अपार्टमेंट दक्षिण बाजूस असलेल्या गटारांची दुरूस्ती करणे 6) संजीवनी अपार्टमेट ते शिवनेरी अपार्टमेंटपर्यतच्या पदपथाची सुधारणा करणे 7) त्रिमूर्ती अपार्टमेंट ते शिवनेरी अपार्टंमेटपर्यतच्या गटारांची दुरूस्ती करणे 8) शिवनेरी अपार्टंमेट ते बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलापर्यतच्या रस्त्याची दुरूस्ती करणे 9) सेक्टर 8 अंर्तगत रस्त्यांची दुरूस्ती करणे 10) संजीवनी अपार्टंमेंट ते उन्नती अपार्टमेंटपर्यतच्या रस्त्याची दुरूस्ती करणे.
9 मे 2015 रोजी नगरसेविका सुनिता रतन मांडवेंचा पालिका सभागृहातून कामकाजाला सुरूवात केली. स्पष्टवक्त्या व कणखर आवाजाच्या नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांच्या आवाजाची झलक आयुक्तांच्या पाहणी अभियानाच्या मागणीदरम्यान नवी मुंबईलाही पहावयास मिळाली आहे. अजून चार वर्षाचा कालावधी बाकी आहे. अवघ्या वर्षभरात पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून एक कोटीपेक्षा अधिक रूपयांची विकासकामे मंजूर करवून घेण्यात नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंना यश आले आहे. उर्वरित कालावधीत प्रभाग पूर्णपणे समस्या मुक्त करण्याचा प्रयत्न असून नागरी सुविधांनी स्थानिक रहीवाशांच्या चेहर्यावर समाधान दिसण्यासाठी पालिका प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिली.