कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फोनची अॅडवान्स बुकिंग १७ मे पासून सुरू करण्यात आली आहे. या फोनची २५ मे पर्यंत बुकिंग केले जाऊ शकते. जर तुम्ही हा स्वस्तातील स्मार्टफोन बुक करणार असाल तर कंपनीचे संकेतस्थळ namotel.com वर जाऊन फोनसाठी नोंदणी करू शकता.
अच्छे दिन स्मार्ट फोनमधील खास फीचर –
– स्क्रीन ४ इंच
– अँड्रायड ५.१ लॉलिपॉप.
– १ GB रॅम, इंटरनल मेमरी ४ जीबी.
– कॅमरा २ मेगापिक्सेल
– ड्यूअल सीम आणि ३जी सपोर्टेड.
अच्छे दिन स्मार्ट फोनमधील खास फीचर –
– स्क्रीन ४ इंच
– अँड्रायड ५.१ लॉलिपॉप.
– १ GB रॅम, इंटरनल मेमरी ४ जीबी.
– कॅमरा २ मेगापिक्सेल
– ड्यूअल सीम आणि ३जी सपोर्टेड.
हा फोन भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनच्या खरीदीसाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही ग्राहकांना देण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राहकांचा प्रतिसाद पाहून फोनच्या बुकिंगची तारीख वाढविण्यात येईल.
जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर पहिल्यांदा तुम्हाला bemybanker.com वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही namotel.com वर हा स्मार्टफोन खरेदी करू शकाल. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा १०० रुपये जमा करावे लागतील त्यानंतर तुम्हाला कंपनीची लाइफ टाइम सदस्यत्व मिळेल. कंपनीने या फोन निर्मितीच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ चा दावा केला आहे.