पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची स्पष्ट बहुमताकडे घोडदौड सुरू आहे. त्या भवानीपूर मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. त्या पुन्हा सत्तेत येणार असे सध्याचे चित्र दिसत आहे. तामिळनाडूत जयललितांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर करुणानिधींचा पक्षही चांगली कामगिरी करत आहे, केरळात लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटची विजया मिळवला आहे. आसाममध्ये भाजप आघाडीचे सरकार येणार अशी परिस्थिती दिसत आहे.
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री जयललिता आघाडीवर आहेत. तर डीएमडीके पक्षाचे अध्यक्ष विजयकांत पिछाडीवर आहेत. केरळमध्ये भाजप उमेदवार श्रीशांतचा पराभव झाला आहे.
नुकत्याच ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पाँडेचरीत झालेल्या विधानसभेचा निवडणूक निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीतील ८ हजार ३०० उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.