खडसे यांच्या खासगी पीएने ३० कोटींची लाच मागितल्यामुळे खडसे अडचणीत सापडले आहेत. खडसेचा खासगी पीए असल्याचे सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील यांना ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातून अटकही केली. तर महसूलमंत्री खडसे यांचे जवाई प्रांजल खेलवलकर यांनी अवैध रित्या परदेशी बनावटीची लिमोजिन गाडी घेतल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. खडसे यांच्या मदतीनेच खेलवलकर यांनी ही परदेशी बनावटीची गाडी परिवहन विभागाकडून पास करून घेतल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, त्यासाठी एकनाथ खडसेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती मेनन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.