एकेकाळचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे एकनाथ खडसे यांना अंहभाव बाळगून शिवसेनेबरोबरची युती तोडण्यात पुढे होते. तसेच विरोधी पक्षनेते असताना सरकारला सळो की पळो करुन सोडणे, ही ही त्यांची त्यावेळची गंमतच होती की काय? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच भुजबळांच्या महाराष्ट्र सदनाचा घोटाळा ही एक गंमत असल्याचे मुख्यमत्र्यांनी सांगू नये म्हणजे मिळविले. तसेच अजित पवारांच्या धन सिंचन घोटाळा असल्याचे नागरिकांच्या समोर आणणे ही पण एक गंमतच आहे, असे म्हणयालाही भाजप सरकारमधील लोक मागे बघणार नाहीत.