ठाणे : इफेड्रीनप्रकरणी तपास करताना ठाणे पोलिसांना अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नावे मुंबई-ठाण्यासह गुजरातमध्ये विविध ठिकाणी एकूण आठ बँक खाती असल्याची माहिती मिळाली आहे. या खात्यांतून वर्साेवा येथील फ्लॅटच्या देखभालीचे पैसे जमा केले जातात. एका नामंकित बँकेचा मॅनेजर संजय शर्मा याने ही खाती उघडून दिल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली.शीळ-डायघर मध्ये पकडलेल्या नायजेरियननंतर सोलापूर हे इफेड्रीनचे देशातील केंद्र असल्याचे समोर आले. हे आंतरराष्ट्रीय ड्रग्जचे रॅकेट असण्यावर शिक्कामोर्तब झाले. केनियातील कुप्रसिद्ध ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामी यांचेही नाव पुढे पुढे आल्याने ममता कुलकर्णी हिचाही याप्रकरणी काही संबंध असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. हा तपास करीत असताना, तिची मुंबईतील मालाड, परेल, धारावी, नरीमन पाँर्इंट तर ठाण्यातील कल्याण आणि बदलापूर तसेच गुजरात येथील भुज आणि राजकोट अशा ८ बँकेत खाती असल्याची माहिती मिळाली. तर मुंबईतील वर्सोवा येथे विक्की गोस्वामी, त्याचा भाऊ आणि ममता कुलकर्णीच्या बहिणीच्या नावे फ्लॅट असल्याचे समोर आले. तसेच गोस्वामी हा दुबईला पकडल्यानंतर तो कारागृहात असताना त्याच्या व्यवसाय आणि मालमत्तेचे व्यवहार ममता कुलकर्णी पाहत होती. याचदरम्यान, ते दोघे विवाहबद्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- ।अॅक्सीस बॅकेचा मॅनेजर संजय शर्मा यांच्या चौकशीत ममता कुलकर्णीच्या बॅक खात्यांची माहिती पुढे आली. या खात्यातून मुंबईतील तीन फ्लॅटचे पैसे जमा केले जात होते. त्या खात्यांमध्ये किती पैसे आहेत़? ड्रग्जप्रकरणीही या खात्यातून पैसे दिले गेले आहेत का? तसेच पुर्वीच्या देवाण-घेवाणाबाबत तपास करण्यात येणार आहे. त्यानंतर यासंबधी निष्कर्ष मांडता येणार आहे.
– पराग मणेरे, पोलीस उपायुक्त, ठाणे गुन्हे शाखा.
- शर्माच्या माध्यमातून खाती उघडली
युटीआय बँकेत कामाला असताना संजय शर्माची ममता कुलकर्णीशी ओळख झाली होती. त्याच ओळखीच्या माध्यमातून शर्माची बदली झाल्यानंतर त्या बँकेत तो कुलकर्णीच्या नावे नवीन बँक खाते उघडत असे.