नवी दिल्ली, – सीबीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यंदा निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत. या परीक्षेत एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९६.३६ टक्के मुली व ९६.११ टक्के मुलांनी परीक्षेत यश मिळवले.. तिरुअनंतपुरम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.८७ टक्के इतका लागला आहे.
१ मार्च ते २८ मार्च २०१६ दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी १२ लाख ९१ हजार २९३ विद्यार्थी बसले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणा-यांचे प्रमाण ८.५ टक्क्यांनी वाढले.
विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे :
अजमेर : ९६.६१ टक्के
भुवनेश्वर : ९७.९० टक्के
चंदीगड : ९६.५३ टक्के
दिल्ली : ९०.४४ टक्के
गुवाहाटी : ८४.२१ टक्के
मद्रास : ९८.५५ टक्के
पाटणा : ९६.४७
अलाहबाद : ९३.७९ टक्के
तिरुअनंतपुरम : ९९.८७ टक्के
डेहराडून : ९६.७४ टक्के