नवी मुंबईः बेपत्ता झालेल्या आणि पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी संपूर्ण देशभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कानच्या यशस्वीतेनंतरयमहाराष्ट्रामध्ये ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र-2 शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून यासंदर्भात देण्यात आलेल्या निर्देशानुसार सदर शोध मोहिम 1 ते 30 जून या कालावधीत संपूर्ण
राज्यभरातील हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान गत 5 वर्षामध्ये बेपत्ता झालेल्या आणि पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुला-मुलांची माहिती पोलिसांकडून नव्याने संकलीत करण्यात येणार आहे. तसेच त्यांचा शोध घेण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी सर्व राज्यांनी ऑपरेशन मुस्कान शोध मोहिम राबविण्याबाबतच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने गत वर्षामध्ये संपूर्ण देशभरात ऑपरेशन मुस्कान मोहिम राबविण्यात आली होती. या विशेष शोध मोहिमेमुळे अनेक बेपत्ता झालेल्या बालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले होते. या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर 1 ते 30 जून या महिन्याभराच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र-2 शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान सन 2010 ते 31 मे 2016 या पाच वर्षाच्या कालावधीत हरविलेल्या आणि पळवून नेण्यात आलेल्या; परंतु मिळून न आलेल्या मुलांची माहिती नव्याने अद्ययावत संकलित करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलिसांकडून देखील सदर विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांकडून बेपत्ता झालेल्या आणि पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुला मुलींचा शोध घेण्यासाठी आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्त्यावर-सिग्नलवर भिक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले तसेच धार्मिक स्थळ, रुग्णालय आदि ठिकाणी काम करणार्या अल्पवयीन मुलांचा देखील शोध घेण्यात येणार आहे. त्यानंतर सदर सर्व मुलांना हरविलेली मुले समजून त्यांचे फोटो आणि त्यांची संपूर्ण माहिती अद्ययावत तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर अशा मुलांची माहिती www.trackthemissingchild.com संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. शोध मोहिमेदम्यान हरविलेली आणि पळविलेली मुले सापडल्यास त्यांची सविस्तर माहिती संबंधित वेबसाईटवर टाकण्यात येऊन अशा मुलांना बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान सापडलेल्या मुलांच्या आई-वडीलांनी सदरचे मुल आपले आहे, याबाबत सक्षम पुरावे सादर केल्यानंतरच ते मुल बाल कल्याण समितीकडून कायदेशीर पालकांकडे सुपूर्द टाकण्यात येणार आहे.
शोध मोहिमेदम्यान हरविलेली आणि पळविलेली मुले सापडल्यास त्यांची सविस्तर माहिती संबंधित वेबसाईटवर टाकण्यात येऊन अशा मुलांना बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान सापडलेल्या मुलांच्या आई- वडीलांनी सदरचे मुल आपले आहे, याबाबत सक्षम पुरावे
सादर केल्यानंतरच ते मुल बाल कल्याण समितीकडून कायदेशीर पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र-2 शोध मोहिम यशस्वीरित्या पूर्ण व्हावी यासाठी नवी मुंबई आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत बालकासंबधी कायद्याचे आणि कार्यपद्धतीबाबत, पोलिसांचे कर्तव्य, मुले सापडल्यानंतर करावयाची कार्यवाही याबाबत पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले.