शाळकरी मुलांचाही समावेश
मुंबई : लोकल ट्रेनखाली रोजच अनेक प्रवाशी मृत्युमुखी पडत आहेत. यावर रेल्वेकडून उद्घोषणा करण्यात येते तरीही,काही युवक लोकलच्या छतावरून चढून स्टंट करतात. रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी ६४२ स्टंटबाजांवर कारवाई केली.
लोकलवरुन स्टंट करताना युवकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने अशा स्टंटबाजाना पकडण्याची मोहीम राबवली. मध्यरेल्वे आणि हार्बर मार्गावर २५ च्यावर स्टंटबाजाना पकडले. यात काही अल्पवयीन शाळकरी मूलांचा सुद्धा समावेश होती. यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तर शाळकरी मुलांच्या पालकांना बोलावून त्यांची मुले कशा प्रकारे लोकलचा प्रवास करतात याची माहिती दिली. रेल्वे सुरक्षा दलाने अशी कारवाई सतत राबवणे आवश्यक आहे. १ जानेवारी पासून अशा ६४२ स्टंटबाजांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरत्रा दलाने दिली.