सुसंवादातून समस्या निवारण करणारा प्रभावी उपक्रम
नवी मुंबई : जनसंवादातून सुसंवाद साधून नागरिकांच्या समस्या निवारण करणारा आमदार संदीप नाईक यांचा लोकप्रीय जनसंवाद हा उपक्रम येत्या १० जुलै रोजी खास कोपरखैरणे विभागासाठी आयोजित करण्यात आला आहे. ऐरोली आणि घणसोली विभागाकरीता यापूर्वी झालेल्या जनसंवाद उपक्रमांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. कोपरखैरणे भागासाठी देखील असा उपक्रम राबवावा, अशी मागणी मोठया संख्येने कोपरखैरणेवासियांनी केली होती.
प्रभाग दौरे, आमदार आपल्या दारी, जनसंपर्क कार्यालयातून नियमित उपस्थिती, शासकीय बैठका आदींच्या माध्यमातून थेट संवाद साधून आमदार संदीप नाईक जनतेच्या समस्या सोडवित असतात. याच भूमिकेतून त्यांनी जन संवाद हा अभिनव उपक्रम सुरु केला. १३ सप्टेंबर २०१५ रोजी ऐरोली विभागाकरिता जनसंवाद हा उपक्रम सर्वप्रथम त्यांनी आयोजित केला होता. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी जन संवाद हा उपक्रम घणसोली भागाकरिता पार पडला होता. या दोन्ही उपक्रमांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.अनेक समस्यांची सोडवणूक झाली होती. कोपरखैरणे विभागाकरिता होणारा जनसंवाद उपक्रम रविवार, १० जुलै रोजी सकाळी १० वाजता शेतकरी समाज सभागृह, सेक्टर ४, कोपरखैरणे येथे होणार आहे. या उपक्रमामध्ये मांडण्यात येणार्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शासकीय आणि निमशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येणार आहे.