-
मुंबई : प्रतिस्पर्धी बनलेल्या मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारितील रस्त्यांची पाहणी शिवसेनेने एकीकडे सुरु केली आहे. त्याचवेळी मुंबईत फक्त 66 खड्डे असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा खोडून काढण्यासाठी विरोधी पक्षासह भाजप रस्त्यावर उतरले आहे. काँग्रेस व महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपाने खड्डे मोजण्यासाठी यंत्रणा कामाला लावून शिवसेनेच्या तोंडाला फेस आणण्याची तयारी केली आहे.महापालिकेची आगामी निवडणूक स्वतंत्र लढविण्याची शक्यता असलेल्या शिवसेना भाजपा युतीमध्येच रस्सीखेच सुरु आहे. आतार्पयत श्रेय घेण्यासाठी उभय पक्षांमध्ये चढाओढ सुरु होती़ मात्र आता मित्रपक्षाला गोत्यात आणण्याचे डावपेच आखले जात आहेत. एकीकडे शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यांची पाहणी सुरु केली आह़े तर भाजप महापालिकेच्या रस्त्यांची पोलखाले करणार आहे.पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी शुक्रवारी केल्यानंतर आज लगेचच शिवसेनेच्या शिलेदारांनी सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता गाठला. यामुळे भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हे रस्ते महापालिकेने ताब्यात घेण्याचे ऐनवेळी टाळल्यामुळेच पीडब्ल्युडीचे रस्ते खड्ड्यात असल्याचा बचाव भाजपाने केला. मात्र शिवसेनेचे दौरे सुरुच असल्याने भाजपा खड्डे बुजविण्याच्या कामातील हातचलाखी उघड करणार आहे.खड्ड्यांच्या छायाचित्रंचे प्रदर्शनमनसेने शुक्रवारी मुंबईभर ‘सेल्फी विथ खड्डे’ व खड्ड्यांभोवती रांगोळी अशी मोहीम छेडली़ तर काँग्रेसने खड्ड्यांच्या छायाचित्रंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणो यांच्या कार्यकत्र्यानी मुंबईतील खड्डे मोजल़े या मोहिमेतून 450 खड्डे आढळून आले. ‘मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई’ या शीर्षकाखाली खड्ड्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 12 जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात भरविण्यात आले आहे. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत असलेल्या या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.भाजपाकडे खड्ड्यांची व्हिडिओ क्लिपमुलुंड ते घाटकोपर एलबीएस मार्गाची पाहणी भाजपाने केली आह़े खड्डे भरण्यात कसे गोलमोल केले जात आहे, याचे वास्तवही भाजपा उघड करणार आह़े या मार्गावरील खड्ड्यांची व्हिडिओ क्लिप 12 जुलै रोजी महापौर व आयुक्तांना सादर करण्यात येणार आह़े
निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळेच खड्डे
खड्डे भरण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा संशय उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केला असताना महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तानेच याची कबुली दिली असल्याचे उजेडात आले आहे. खड्डे दुरुस्तीसाठी पालिका पुरवत असलेले असफाल्ट मॅकडम पद्धतीचे डांबर थोडय़ाशा पावसातही टिकाव धरत नसल्याचे पत्र जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर यांनी प्रमुख रस्ते अभियंता मनोहर पवार यांना पाठविले आहे.
महापालिकेच्या वरळी येथील प्लँटमधून खड्डे भरण्याचे साहित्य पुरविले जात़े मात्र हे साहित्य सील केलेले नसत़े तसेच प्लँटमधून पुरविण्यात येणारे असफाल्ट मॅकडम या पद्धतीचे डांबराचे मिश्रणही प्रभावी नाही़ त्यामुळे दुरुस्त केलेले खड्डे दुस:या दिवशीच पुन्हा उखडत असल्याचे बिरादर यांनी पत्रतून निदर्शनास आणले आह़े त्यामुळे आतार्पयत पावसाच्या नावाने डांगोरा पिटणा:या महापालिकेचे पितळं उघडे पडले आह़े
खड्डे दुरुस्त न केल्यास अधिका:यांचे अपहरण करु, असा इशारा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी दिला होता़ त्यानंतर बिरादर यांनी हे पत्र रस्ते विभागाला पाठविले असल्याचे दिसून येत़े प्लँटमधून डांबर मिश्रण पाठविताना सील कोट करुन पाठवावे, तसेच खड्डे दुरुस्तीसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्याची विनंती बिरादर यांनी रस्ते विभागाला पत्रद्वारे केली आहे.
इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांची यादी जाहीर
मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचेही रस्ते आहेत. मात्र हे रस्ते खड्ड्यात गेले तरी शिव्यांची लाखोली महापालिकेलाच वाहिली जात़े पालिकेच्या आगामी निवडणुकीत खड्डे प्रकरणच शेकणार असल्याने अन्य प्राधिकरणांच्या विशेषत: राज्य सरकारच्या अखत्यारितील रस्त्यांची यादी जाहीर करण्याचा दबाव शिवसेनेने पालिका प्रशासनावर टाकल्याचे सुत्रंकडून समजत़े म्हणून यावेळीस पहिल्यांदाच महापालिकेने इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांची यादी जाहीर केली आह़े त्यानुसार रस्ते, उड्डाणपूलांचा यात समावेश आह़े यामध्ये ज़ेज़ेउड्डाणपूल, पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्वमुक्त मार्ग, सायन उड्डाणपूल, किंग्ज सर्कल उड्डाणपूल, वांद्रे कुर्ला संकुलातील सर्व रस्ते, आरे कॉलनीतील रस्ते आदींचा समावेश आह़े