अनंतकुमार गवई
नवी मुंबई : पावसाची चाहूल लागल्यामुळे बाजारपेठा छत्र्यांनी सजल्या आहेत. वेगवेगळ्या आकार व रंगांतील छत्र्या उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत त्यांच्या किमती वाढल्या आहेत. मार्केटमध्ये१२० रुपयांपासून ६०० रूपयां पर्यतच्या छत्र्या उपलब्ध आहेत.
मागील दोन वर्षापासून लांब दांड्याच्या पारंपरिक छत्र्या नव्या रूपात बाजारात दाखल झाल्या आहेत.त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासह स्टायलिश लूकमध्ये भर घालणार्या या छत्र्यांना तरुणवर्गाची विशेष मागणी आहे. मे अखेरपासूनच छत्र्यांची विक्री सुरू झाली असून ग्राहकांच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या डिझाईनच्या छत्र्या आणि रेनकोट दुकानात उपलब्ध आहेत. महिलांसाठी रंगीबेरंगी आणि आकर्षक डिझाईनच्या छत्र्या तर लहान मुलांसाठी स्पायडरमन, बेर्बी डॉल तसेच काटरूनची चित्रे,विविध प्राण्यांचे कलरफूल फोटो आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या छत्रीमध्ये तीन ते चार साईज आहेत. लहान मुलांच्या छत्र्यांमध्ये लांब दांड्यांच्या आणि कलरफूल छत्र्यांना मागणी जास्त आहे. थ्री फोल्ड आणि फोर्थ फोल्ड छत्र्याही बाजारात आहेत. पण या छत्र्या जोरदार पावसात आणि वार्यात टिकत नसल्याने मागणी कमी आहे. डबलकोटिंग फ्रिल छत्र्यांना अधिक पसंती ग्राहकांकडून मिळत आहे. पुरुषांसाठी मात्र काळ्या आणि लांब दांड्यांच्या छत्र्या उपलब्ध असल्याचे वाशी सेक्टर १९ येथील परेश गाडा या विक्रेत्याने सांगितले आहे.
बाजारपेठेतील छत्र्यांच्या किंमती पुढील प्रमाणे
* लहान मुलांच्या छत्र्या – ८० ते १६० रूपयांपर्यत
* लेडीज छत्र्या थ्री फोल्ड – २०० ते ३५० रूपयांपर्यत
* डबलकोटिंग – १२० ते २०० रूपयांपर्यत
* छोटी : १०० ते १५० रूपयांपर्यत
* फ्रील छत्री – ३०० ते ४२५ रूपयांपर्यत
* लांब दांडा _ १०० ते १८० रूपयांपर्यत
* जेंटस छत्री _ १८० ते ५००० रूपयांपर्यत
* काळी छत्री – ८० ते १५० रूपयांपर्यत
* पावसाळी जॅॅकेट – १५० ते १००० रूपयांपर्यत