मुंबईच्या लोकल ट्रेनमधून दररोज जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. शहरातील तिन्ही मार्गावरून धावणाऱ्या या लोकलमधून पडून रोज सरासरी १० जण मृत्युमुखी पडतात. यात काहीजण स्टंट करताना, रेल्वेरूळ ओलांडताना, टपावरून आणि दरवाज्यात लटकून प्रवास करताना दगावतात. या संबंधी वारंवार उद्घोषणा केली जाते पण, स्टंटबाज लोक मात्र स्टंटबाजी करुन आपला जीव गमावतात. या स्टंटबाजांबरोबर इतर प्रवाशांचा वेळ आणि रेल्वेचे मात्र, आर्थिक नुकसान होते.
अशाच प्रकारे काही प्रवासी छतावरून, दरवाजात उभे राहून प्लॅटफॉर्मवर पाय घासतानाचे अनेक व्हिडिओ रेल्वे स्थानकांवरील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. असे स्टंट करणाऱ्यांवर आता आरपीएफने कारवाई सुरु केली आहे. अशा स्टंटबाजांना पकडून त्यांचे हार घालून स्वागत केले जात आहे. आरपीएफच्या या गांधीगिरीमुळे स्टंटबाज सुधारातील असे वाटत नाही. कारण ही कारवाई सुरु असतानाही काही बिनडोक स्टंटबाज लोकल ट्रेनच्या टपावरून आणि दारातून स्टंटबाजी करताना दिसतच होते. तसेच या पोलिसांना हिनावत असताना दिसत आहे.
अशा प्रकारची कारवाई यापुढे करू असे, आरपीएफचे पोलीस निरीक्षक रणजित सिंग यांनी सांगितले आहे.
काही स्टंटबाज हे महिला डब्यातून प्रवास करतात. या स्टंटबाजांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली. पण, पकडल्यानंतर त्यातील थोड्यांनाच पश्चात्ताप होतो. या स्टंटबाजांना हार घातल्यानंतर उपरती झाली आणि पोलिसांना सोडून देण्याची विनंती करू लागले. तर काही बेशरम हसतच होते.
गेल्या ३ दिवसात ३५ जण मृत्युमुखी पडले तर, ४० जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारपासून ते शनिवारपर्यंत मानखुर्द ते चेंबूर दरम्यान टपावरून प्रवास करणारे ३ स्टंटबाज ओव्हरहेड वायरला चिटकले. यातील २ जणांचा जळून मृत्यू झाला. तर एकाला राजावाडी रुग्णालयाचे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. गेल्या १ जानेवारीपासून हार्बर लाईनवर मानखुर्द ते कुर्ला दरम्यान १६ जण ओव्हरहेड वायरला चिटकून जळाले आहेत. यावर प्रशासनाने सुद्धा काय करावे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.