ठाणे :- दोन हजार कोटीच्या एफेड्रीन प्रकरणात ठाणे पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी विकी गोस्वामी आणि या प्रकरणातील सहआरोपी ममता कुलकर्णीच्या तपासासाठी पोलिसांनी या आरोपींच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने चक्क ड्रग माफिया पती विकी गोस्वामीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारल्याची धक्कदायक माहिती पोलीस तपासात उघड झाली. मुस्लिम धर्म स्विकारल्यानंतर ममताने आपले नाव आयशा हसन ठेवल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
ममता कुलकर्णीचा पती व इंटरनॅशनल ड्रग माफिया विकी गोस्वामीला ड्रग स्मगलिंगच्या आरोपाखाली दुबईत १४ वर्षाची शिक्षा झाली होती. तेव्हा ममता कुलकर्णीने मुंबईतील काही नामवंत वकिलांसह दुबईत वकिलांची फौज उभी करून त्यास या केसमधून सोडवण्याचा प्लॅन केला. स्थानिक कायद्यानुसार ममताने विकीसह मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर देखील ममताने हिंदू धर्माच्या कुंभमेळाल्याला हजेरी लावली होती. २०१३ साली अलाहाबाद येथे पार पडलेल्या कुंभमेळ्याला ममता कुलकर्णी भारतात आली होती. तेव्हा आपल्या नातेवाईकांसह ममताने या कुंभमेळ्यात हिंदू धर्मानुसार पवित्र स्नान केल्याची माहिती विकी गोस्वामींची बहीण रिटा गोस्वामी हिने ठाणे पोलिसांना दिली आहे.
दरम्यान आरोपींनी त्यांच्या भारतात राहणार्या काही नातेवाईकांना पैसे पाठवल्याचे देखील समोर आले. त्यात ममता कुलकर्णीने विकी गोस्वामींची बहीण रिटा गोस्वामीला २ कोटी रुपये पाठवल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार ठाणे पोलिसांनी विकीची बहीण रिटा हिची चौकशी सुरू केली आहे. यावेळी तिने ममता कुलकर्णी आपली खूप चांगली मैत्रीण असल्याचे सांगत मैत्रीच्या संबंधातूनच तिने आपल्याला व्यवसायासाठी २ कोटी रुपये दिल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.